कानडाव

शांतीपुर .शांत ,सुखी व समृद्ध गाव . मुलांची छुट – पुट भांडणे होत असत .पण ती भांडणे तासाभरात निवळत असत .गावात वैरभावना नव्हती . सदभावना असल्यामुळेच द्वेषभावना बिलकुल नव्हती . माझ ते माझ . तुझ ते तुझ . असा सरळ सोपा सुखकारक संबंध होता .त्यामुळे विविध जाती – धर्माच्या  लोकात एकोपा होता . सांज – सकाळी  लोक निवांतपणे गप्पागोष्टी करत . मरणादारी व तोरणादारी सारा गाव जमत असे .

पंचायत राज आले .दोन पंचवार्षिक एकमताने गावगाडा चालला . तिसऱ्यांदा निवडणूक आली . तेव्हापासून गावात अवदसा शिरली .एकीची जागा बेकीने घेतली . परस्पर विश्वास वारला .सुख-शांती निवर्तली .जात व धर्माच्या नावानेच गटबाजी सुरु झाली .

ग्रामपंचायत निवडणूक आली . गावात दुफळी माजली . तुकाराम पाटलाचा एक व विनायक गुरूचा दुसरा असे  दोन गट झाले . हसनभाईच्या  पाठींब्यामुळे तुकाराम पाटील सरपंच झाले . विनायक गुरूंनी  सुड घ्यायचे ठरवले .  निवडणूकीतला वाद काळाच्या काखेत जिरला .विनायक गुरूंना अर्धांगवायू झाला .  गुरु मरणार अशी चर्चा  सुरु झाली . सरपंच  गुरूंना भेटायला गेले .गुरु ग्लानीतून सावरले .  त्यांनी माझे प्रेत मुसलमानांच्या स्मशानात दहन करा . अशी अखेरची इच्छा सरपंचांच्या कानात सांगून  तसे वचन सरपंचाला वचन मागितले . सरपंचांनी वचन दिले . गुरु वारले . सरपंच प्रेतयात्रा घेवून मुसलमानांच्या स्मशानभूमीत गेले . मुसलमानांनी विरोध केला . मोठ्ठी दंगल झाली .गाव बेचिराख झाले !

 

Advertisements

— फेरफटका

  ।।  शअच्छे दिनाचे स्वप्न भंगले आणि शेतकरी संपावर गेले .नोटबंदी मूळे मंदी आली .धनिकांनी सोने – चांदी साठवली .व्यापारी व दलालांनी शेतकऱ्यांची अमाप लूटमार केली.५० पैसे ते ७ रुपये दरम्यानच्या किमतीत फळे , भाजीपाला खरेदी करून उखळ पांढरे केले . शेतकरी देशोधडीला लावले . तसेच डिझेल, पेट्रोल, खते, औषधे इ. पक्क्या मालाच्या किंमती भरमसाठ वाढल्या. उत्पादन […]

via — फेरफटका

अच्छे दिनाचे स्वप्न भंगले आणि शेतकरी संपावर गेले .नोटबंदी मूळे मंदी आली .धनिकांनी सोने – चांदी साठवली .व्यापारी व दलालांनी शेतकऱ्यांची अमाप लूटमार केली.५० पैसे ते ७ रुपये दरम्यानच्या किमतीत फळे , भाजीपाला खरेदी करून उखळ पांढरे केले . शेतकरी देशोधडीला लावले . तसेच डिझेल, पेट्रोल, खते, औषधे इ. पक्क्या मालाच्या किंमती भरमसाठ वाढल्या. उत्पादन खर्चही न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.                 बेरोजगार तरुण भाजप च्या नोकरया देण्याच्या वचनाला भुलले होते . परंतु पंतप्रधान मोदी सरकार चे तीन वर्षे भरले . नोकऱ्याचे वचन हवेत विरले . नाराज तरुण शेतकरी संपात उतरले .                          देशभर बेदिली माजली. गोवंश हत्याबंदी शेतकरयांच्या माथी मारली. भारताची मांस निर्यात भरमसाठ वाढली. भाजप चे नेते,कार्यकर्ते व प्रचारक गोपालन करत नाहीत हे लोकांच्या लक्षात आले .        पंतप्रधान मोदी व भाजप नेते नुसतीच बकबक करतात . त्यांच्या कथनी व करणीतील अंतर लोकांना असह्य झाले .    आर्थिक विषमता अमर्याद वाढली .शेतकरी व कष्टकरी जनता हवालदिल झाली अन संपात उतरली आहे .

|| पारदर्शक अंगरखा ||

गोष्ट फार जुनी आहे . पण ती फार शहाणी आहे .एक होता राजा .राजा पडला आजारी .औषध मिळेनासे झाले .शेवटी राजाने जाहीर केले. ” मला औषध देवून बरा करील . त्याला मी अर्धे राज्य देवून जावई करून घेइल ”
दवंडी ऐकून अनेकांनी उपचार केले . पण राजाला बरे वाटेना . राजाचा आजार बळावत गेला .एक दिवस अघटीत घडले . दरबारात एक अफलातून वैद्यराज आले .त्यांनी राजाचा आजार बरा करण्याचे आव्हान स्वीकारले .पण उपचार चालू असतांना नगरातील सर्वांनी गुपचूप बसायचे .कुणीही शब्द उच्चार करायचा नाही . सगळ्यांनी चिडीचूप रहायचे ! राजाने होकार दिला .
वैद्यराजांनी राजाला सांगितले कि ,मी तुमच्यासाठी अदृश्य पेहराव आणला आहे .तुम्ही तो परिधान करा .संपूर्ण नगरीत फेरफटका मारा .तुमचा आजार हमखास बरा होणार .मी आणलेला अंगरखा परिपूर्ण पारदर्शक आहे.परंतु जो भ्रष्ट असेल त्याला व जो दोन बापाचा असेल त्यालाच तुमचा देह दिसेल !
वैद्यराज भरदरबारात राजाच्या अंगातील सारे कपडे काढतात. पारदर्शक अंगरखा राजाच्या अंगात घालतात .
महाराजांचा पारदर्शक अंगरखा कुणालाच दिसत नाही .पण महाराजांचा उघडा – नागडा अगडबंब देह दिसतो ! नागडे महाराज पाहून सारे दरबारी आश्चर्यचकित होतात ! महाराज नागडे दिसत असूनही कोणीही खरे बोलत नाही .प्रत्येकजण आपापल्या आईचा यार कोण ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात गुंग होतो.त्यांना त्यांचा दुसरा बाप आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार दिसायला लागतो ! सगळेच दरबारी गर्भगळीत होतात !
सगळे दरबारी बेभान होतात . महाराजांच्या पारदर्शक अंगरख्याची स्तुती सुरु करतात . दरबारातील लोकांना स्तुतिसुमने उधळतांना पाहून वैद्यराजाला मात्रा लागू पडल्याची खात्री पटते .
मिरवणूक निघते .सात घोड्यांच्या रथात महाराज मधोमध उभे राहतात . महाराज प्रजेचे अभिवादन स्वीकारत निघतात . तुतारी व शंख नादाने आसमंत गरजत असल्याचा भास होतो . नगारे व ढोल – ताश्यांचा ” दिल “तोडक व “कान ” फोडक गोंगाट करत मिरवणूक निघते.असंख्य हत्तीस्वार ,घोडेस्वार, अमाप झेंडे असलेली मिरवणूक निघते . बेधुंदपणे अचकट – विचकट नाचनारे चोळकरी बघण्यासाठी सारी प्रजा रस्त्यावर येते . मिरवणूक प्रधान चौकात येते . एक तरुण झेंडा दाखवतो . मिरवणूक थांबवा असा इशारा राजाकडे बघत बघत करतो .राजा दुर्लक्ष करतो . शेवटी तरूण जोरात ओरडतो.” राजा भोगंळा ! राजा भोंगळा !!” राजा आपल्या अंगावरून हात फिरवतो .त्याच्या हाताला कपड्याचा स्पर्श लागत नाही .शेवटी महाराज आपल्या लिंगाला स्पर्श करतात . त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो .तरूण म्हणतोय ते खरे असल्याचे महाराजांना पटते . राजाच्या मेंदूला जबरदस्त झटका बसतो ! राजाचा आजार एका झटक्यात बरा होतो .
राजा घोड्याची झूल कमरेला गुंडाळूनतो. मिरवणूक झटकन राजवाड्यात नेण्याचा आदेश देतो .मिरवणूक राजवाड्यासमोरील पटांगणात येते . राजा मिरवणुकीचे सभेत रुपांतर करण्याचा आदेश देतो .
प्रंचंड सभेत अगाध शांतता पसरते .महाराज सभेत भाषण न करता पुढील तीन आदेश एका दमात जाहीर करतात .
१ – वैद्यराजांना दक्षिणेला असलेले राज्य व सोमरसाचे ११११ कारखाने देणे ..
२ – तरुणाला ” सत्यवान ” अशी पदवी व उत्तरेचे राज्य देवून जावइ करणे .
३ – ” पारदर्शक ” शब्द वापरावर बंदी घालणे . कुणीही पारदर्शक शब्द वापरला तर त्याला राजवाड्यासमोरील पटांगणात एक तप नग्न उभे राहण्याची सजा करण्याची तरतूद जाहीर केली .
महाराजांनी सभा संपल्याचे जाहीर केले . वचन पूर्ती करून विकास रथात बसून महाराज शय्यागृहात पहुडले !

(४) पूजा ,पुजारी आणि पाळी

२८ नोव्हेंबर २०१५ रोजी अघटीत घटना घडली .शनी शिंगणापूरात भक्तांना नको ती घटना घडली .एक महिला चक्क शनी देवाच्या पारावर चढली . तिने देवपूजा करून मनोभावे देवाचे दर्शन घेतले .महिलेचे दर्शन झालेले पाहून काही भक्तांचा पारा चढला .सुरक्षा रक्षकांना बोलावण्यात आले .रक्षक येईपर्यंतच्या वेळेत  ती महिला  निघूनही गेली .देवानेच  वाचवले असे तिला वाटले असेल .भक्तांच्या कचाट्यात सापडली असती तर तिची  खैर नव्हती .  तिची पार वाट लागली असती .कारण ती देवाच्या चौथर्यावर चढली होती .जेथे महिलांना बंदी आहे तेथे ती गेली होती .

अघटितच घडले म्हणून परिसरातील वातावरण तापले .तिला बघितलेल्या लोकांनी सांगितले कि तिने” जीन प्यांट ” घातलेली होती . मग  तर भडकाच झाला .प्रसिध्यी माध्यमाला मस्त खुराख मिळाला .

एका भक्ताला म्हणालो की आपल्या माय -भगिनी दर्शनासाठी येतात . त्यांना  पारावर येवून दर्शन घ्यायला विरोध का करता ? भक्त म्हणाले कि देवाला विटाळ चालत नाही .पाळी चालू असतांनाही महिला पारावर येतात म्हणून बंदी आहे .असे सांगून त्यांनी चर्चा थांबवली .          भावनिकदृष्ट्या महत्वाच्या विषयावर शांतपणे चर्चा होऊ शकत नाही .असे समाज वास्तव आहे .धर्माचा गैरवापर करून बीजेपीने सत्ता काबीज केली .त्यामुळे भोंदू भक्तांचा उन्माद वाढलेला आहे . पाळी वर चर्चा सुरु करताच भक्त पळतात. नसता हमरी-तुमरी वर येतात .           ” पाळी “अत्यंत शुभ आहे .पाळी गेली तर मूल होत नाही आपल्या आईला पाळी होती म्हणून आपण जन्मलो .विज्ञानाचा किमान एवढा तरी स्वीकार करायला हवा .जीव जन्मा साठीचे   ‘बी ‘तयार करून ,पेरून जीवाचे संवर्धनासाठी पाळीला पर्याय नाही . निसर्गाने स्त्रीला दिलेली ही विशेष क्षमता आहे .पूजा करतांना तिला वाळीत टाकणे चूक आहे .                                पुजारी मंडळी साठी भेदभाव विशेष गरजेचा आहे .भेदभावा मुळे त्यांचे मोठेपण व विशेष स्थान अबाधित राहते .देव त्यांनाच पावतो .रोजी रोटी देतो .अन वरकमाई भरपूर देतो .जगाचा निर्माता  ,करता-करविता देव आहे  .असे भक्तांना सांगणारा पुजारी देवानेच दिलेली पाळी अशुभ मानतो .विटाळ कवटाळतो अन भाविक टाळ्या वाजवतात .                                     धर्माच्या नावाने महिलावर अन्याय करणे बंद करा. नसता नजीकच्या काळात धर्मवरच संकट येईल .  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वोवितील  पुढील शब्द  अंमलात आणायला हवे .                                ” जो  जे जाणिजे जिवंत ,तो ते मानिजे भगवंत “

दोन रंग

मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ भरात होती .समाजवादी,कम्युनिस्ट,आरपीआय ,इ. सर्व पुरोगामी नामांतराच्या बाजूने चळवळ करत होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठ|ला देवू नये म्हणून शिवसेना,बीजेपी व काही कॉंग्रेसवाले विरोधात होते .

१९८२ मध्ये ” लॉंग मार्च ” ची तयारी करण्यासाठी नामांतरवादी कृती समितीची बैठक झाली .बैठकीत पोस्टर्स  छपाईची जबाबदारी साथी महमद खडस यांनी समता आंदोलनाच्या वतीने घेतली . रामदास आठवले यांनी दोन रंगी पोस्टर्स करण्याची सूचना केली होती .

नामांतर चळवळ भरात असली तरी निधीची चणचण होती .कार्यकर्ते भरपूर असले तरी निधी जमविणारे कार्यकर्ते कमी होते . नंतरच्या बैठकीत पोस्टर्स घेऊनच आम्ही गेलो .पोस्टर पाहून रामदास आठवले चिडले .एकाच रंगात पोस्टर  छपाई का केली ? असे त्यांनी जोरात विचारले .

तेव्हा साथी महमद खडस शांतपणे म्हणाले की दोन रंग आहेत. शाईचा एक रंग आणि कागदाचा दुसरा रंग !

रामदास आठवले आता कुठे आहेत असे विचारू नका ,ते सगळेच विसरले आहेत .

हेच ते शिल्प !

देवपूजा

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील टाहकरी गाव .पट्टा किल्याच्या पायथ्याशी वसलेले. सुप्रसिध्द हेमाडपंथी जगदंबा मंदिर गावाची शान आहे .नवरात्रात परिसरातील १००-१२५ गावातील लोक दर्शनाला येतात .

खजूराहोतील मिथुन शिल्पांच्या तोडीची शिल्प जगदंबा मंदिराच्या भिंतीवर आहेत .शिल्पकारांनी जीव ओतून काळे  पाषाण सजीव केलेले आहेत शिल्पकार कलात्मक संजीवनी देवून दगडाला सजीव करू शकतात .शिल्पकारांच्या अगाध लीला येथे मूर्तरूपात आहेत .तेथील अदभूत ,अप्रतिम सुंदर शिल्प बघतांना आपले भान हरपते .

मी एकाग्र चित्ताने शिल्पकारांची करामत बघत होतो .तेव्हा एखंडे आजोबांनी मला भानावर आणले .माझा हात धरून त्यांनी मला एका शिल्पा जवळ नेले .त्या शिल्पावर भरपूर हळद-कुंकू टाकलेले होते .शिल्पाला बोट लावून ते म्हणाले कि ‘जय हुनुमान ‘.हाच आमच्या गावाचा मारुती आहे .आमच्या गावात हनुमान मंदिर नाही .बघा आमचा हनुमान रावणाच्या बोकांडी बसलाय .मी ते शिल्प अत्यंत बारकाइने पहिले ,ते शिल्प हनुमान अन रावणाचे नव्हते .तर ते एक परिपूर्ण मिथुन शिल्प होते !

एखंडे आजोबांना मी साक्षात दंडवत केला . भक्तांचा विजय असो !अशी घोषणा देवून टाहकरीला रामराम केला .

!